विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घाई झाली आहे, पण त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती महाराष्ट्रातल्या हिंसक राजकारणाच्या चिखलात रुतत चालली आहे.
महाराष्ट्रात आता लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाव्यात. कारण स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेची अनेक कामे अडली आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने अद्याप तरी कुठली तयारी सुरू झालेली दिसत नाही. उलट बीड प्रकरणातील वेगवेगळे खुलासे रोज समोर येताना राष्ट्रवादी नावाची प्रवृत्ती त्या हिंसक राजकारणाच्या चिखलात रुतल्याचेच रोज उघड होत चालले आहे.
भले आज धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री असतील, पण त्यांची मूलभूत राजकीय जोपासना प्रामुख्याने शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीतच झाली. त्यांचे बीड जिल्ह्यातले सगळे हिंसक राजकारण अखंड राष्ट्रवादीनेच पोसले आणि पालन पोषण केले. त्यातूनच वाल्मीक कराड नावाची राख माफिया प्रवृत्ती निर्माण झाली. त्याने बीड जिल्ह्यात हिंसाचाराचा धुमाकूळ घातला. त्यावेळी शरद पवारांसकट त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज अजित पवार बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणातून नामानिराळे होऊ पाहत आहेत. पण याच वाल्मीक कराडचे शरद पवार + सुप्रिया सुळे + रोहित पवार वगैरेंच्या बरोबर फोटो सगळीकडे झळकले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना वाल्मीक कराड बरोबरच्या जुन्या संबंधांचा इन्कार करता आला नाही.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 7 आणि 8 तारखेला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक होत आहे. पण त्यामध्ये त्यांचे आमदार आणि खासदार अजित पवार आणि भाजप यांच्या सत्तेच्या वळचणीला निघून जाण्यासाठी आग्रह धरणार असल्याची बातमी समोर आली आहे. तिथे देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा किंवा संघटनात्मक तयारी यापेक्षा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्याचा आग्रह प्रभावी ठरण्याची शक्यता आहे, तरी देखील सुप्रिया सुळेंना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घाई झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App