Supriya sule : शरद पवारांच्या ऐवजी सुप्रिया सुळे मनोज जरांगेंच्या भेटीला; पण सामोरे जावे लागले मराठा आंदोलकांच्या रोषाला!!

Supriya sule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऐन गणेशोत्सवात मुंबईकरांना वेठीला धरणारे मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना शरद पवार आज भेटायला येणार होते, पण त्यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्या. तिथे त्यांनी काही वेळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे घेतात तसेच तोंडसुख सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घेतले. पण तरी देखील मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी काहीही केली नाही म्हणून सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. Supriya sule

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी काल रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. शरद पवार तुमच्या भेटीला येणार आहेत, असा निरोप त्यांनी जरांगे यांना दिला होता. त्यानुसार शरद पवार आज मनोज जरांगे यांच्या भेटीला येण्याची अपेक्षा होती‌. परंतु, शरद पवार मनोज जरांगे यांच्या भेटीला आले नाहीत.



त्यांच्या ऐवजी खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगेंना भेटायला आल्या. त्यांनी जरांगे यांच्याशी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे घेतात तसेच तोंडसुख सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घेतले. आमची घरे आणि पक्ष फोडून झाले. आता तुम्ही मुख्यमंत्री झालात ना. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे .लवकर निर्णय घ्या विधानसभेचे खास अधिवेशन बोलवा. त्यात 24 तास चर्चा करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळापासून बाहेर पडताना सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या संतापला सामोरे जावे लागले. शरद पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले. त्यांनी मराठा आरक्षणासाठी काही केले नाही, असे मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले. काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या.

Supriya sule faced Maratha agitation wrath

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात