नाशिक : Supriya Sule बारामती नगरपरिषद निवडणूक लढवणारे कार्यकर्ते वाऱ्यावर; पण सुप्रिया सुळे भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात नाचल्या डान्स फ्लोअर वर नाचताना आढळल्या!!Supriya Sule
महाराष्ट्रात नुकत्याच नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे आपले नशीब आजमावले. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी तुटली. वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या स्थानिक सोयीनुसार आघाडी किंवा युती केली.Supriya Sule
सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षांचा प्रचार केला यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर राहिले. पण उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे राज ठाकरे हे नेते प्रचारात कुठे फिरकले सुद्धा नाहीत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे कुठे आघाडी होईल न होईल, आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते राबतात. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे ऐकले पाहिजे, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली होती. पण कार्यकर्त्यांच्याच या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बाकी ठिकाणी सोडा बारामतीत सुद्धा बाहेर पडलेल्या दिसल्या नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार बारामतीत युगेंद्र पवार यांनी केला.Supriya Sule
– बारामतीत सुप्रिया सुळे प्रचारात गैरहजर
बारामतीत सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडले, त्यांनी कार्यकर्त्यांचा प्रचार केला नाही, पण त्या युगेंद्र पवारच्या लग्नात आवर्जून नाचल्या. त्यापलीकडे जाऊन त्या भाजपा खासदाराच्या मुलीच्या लग्नात विरोधी पक्षाच्या खासदारांबरोबर सुद्धा नाचताना दिसल्या. भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात खासदार कंगना राणावत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि खासदार सुप्रिया सुळे या डान्स फ्लोअरवर जाऊन एकत्र नाचल्या. या नाचाचा व्हिडिओ सगळीकडे प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी सर्व पक्षांच्या खासदारांवर जोरदार टीकेची झोड उठवली. एकीकडे सर्वसामान्य माणूस किरकोळ गोष्टींसाठी त्रासलेला असताना दुसरीकडे सगळ्या पक्षांचे खासदार लोकांच्या लग्नात नाचण्यात मग्न आहेत, असे टीकास्त्र अनेकांनी सोडले. हे सगळे खासदार लोकसभेत आणि लोकसभेत बाहेर एकमेकांशी भांडतात पण लोकांच्या पार्ट्यांमध्ये आणि लग्नांमध्ये जाऊन एकत्रच नाचतात यातून जनतेनेच धडा शिकला पाहिजे, असे परखड मत अनेकांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App