विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.Supriya Sule
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचया युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, कार्यकर्त्यांची इच्छा, जे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते होते, त्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची ही इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होते. याच टीमवर्कच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली.Supriya Sule
शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का?
महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाईल का? तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांवर फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे, त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का?
तसेच सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार अशा देखील चर्चा सुरू असतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुळे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App