प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांच्या मागे विविध भ्रष्टाचाऱ्याच्या तसेच खंडणी वसूलीच्या प्रकरणांमध्ये सक्तवसूली संचलनालय ED, सीबीआय या तपास संस्थांच्या चौकशीचे आणि तपासाचे शुक्लकाष्ट लागले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी त्यावर प्रतिटोला देखील हाणला आहे. supriya sule – chandrakantdada patil spat over ED and CBI inquires of MVA ministers
सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ईडीचा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय… आमच्या जेष्ठ नेत्यांना, मंत्र्यांना टार्गेट केले जातेय. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवले जातेय. ही कुठली संस्कृती आहे? असले प्रकार मी सुसंस्कृत महाराष्ट्रात, भारतीय संस्कृतीत पूर्वी कधीही पाहिलेले नाहीत, हे प्रकार दुर्दैवी आहेत.”
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावरून चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारमधल्या काही लोकांना ईडीचा फायदा होतोय असे वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावेत. आणि सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही, तर त्यांनी वडिलांनाच विचारावे की इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर कसा केला ते…!!”
चंद्रकांतदादांनी थेट सुप्रिया सुळेंना असा प्रतिटोला हाणल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चलबिचल झाली आहे. शिवाय सुप्रिया सुळे यांनी ईडीचा राष्ट्रवादीला फायदा झाल्याचे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना नेत्यांना ईडी अडचणीत आणतेय ते एक प्रकारे बरेच आहे, अशा त्यांच्या भावना असल्याचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये पसरल्याने शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App