प्रतिनिधी
नागपूर : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणे ही काही भाकरी फिरवणे नव्हे, तर ही निव्वळ धुळफेक करणे आहे, अशी खोचक टिपण्णी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. Supriya Sule as the working president of NCP says devendra fadnavis
शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर धूळफेक केली आहे, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फार लक्ष देत नाही, असा टोला लगावला.
राष्ट्रवादीने भाकरी फिरवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, तेव्हा फडणवीस हसले. नंतर त्यांनी उत्तर दिले. याला भाकरी फिरवणे म्हणतात असे मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धूळफेक आहे. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला कार्याध्यक्षपद दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, त्यावर अजित पवारांनी पलटवार केला.
राष्ट्रवादीने काय करावे, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार – खासदार लोकप्रतिनिधी हे त्याबद्दलचा निर्णय घेतील. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. टीका टिप्पणी करणे त्यांचे काम आहे, असे अजित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेनेला टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनीही प्रत्युत्तर दिले. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी जरूर करावेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App