विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. नाराजीच महत्वाचं कारण म्हणजे सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलच फटकारल आहे.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाईचा अर्ज केलेल्या सर्व नातेवाईकांना १० दिवसांच्या आत रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश एमआर शाह आणि न्यायाधीश बीवी नागरत्ना यांच्या पीठाने म्हटलं की, एकूण ८५ हजार अर्ज आले होते त्यातील फक्त १६५८ जणांना मंजुरी मिळाली असून त्यांना ९ डिसेंबरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. महाराष्ट्राने सर्व अर्जदारांना १० दिवसांच्या आत ५० हजार रुपये अनुदान रक्कम द्यावेत असे आदेश पीठाने दिले आहेत.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना या संबंधित सर्व राज्यांच्या अहवालासह न्यायालयासमोर एकत्रित बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. राज्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना भरपाईसंदर्भातील योग्य माहिती न पोहोचवल्याच सर्वोच्च न्यायालयाने म्हटल आहे.तसंच आधीच्या आदेशाचे पालन करण्यासही सांगितलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App