वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आज आदेश देऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने याप्रकरणी 7 सप्टेंबर रोजी शेवटची सुनावणी ठेवली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गट पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करत आहेत.Supreme Court is likely to deliver verdict on Shiv Sena dispute today Thackeray group wants to block Election Commission’s action
एकनाथ शिंदे यांचे बंड
एकनाथ शिंदे यांचे बंड आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात शिंदे गटातील 16 आमदारांची अपात्रता, राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण, नवीन विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आणि पक्षाचे अधिकार यावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे. दुसरीकडे कारवाई थांबवण्याच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध होत आहे. आयोग आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे प्रकरण 23 ऑगस्ट रोजी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले होते. दोन्ही गटांच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने आपली कारवाई सुरू ठेवायची की नाही यावर निकाल येईल. सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आपली कारवाई थांबवली आहे.
गेल्या सुनावणीत काय म्हणाले न्यायाधीश
7 सप्टेंबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत खंडपीठाचे सदस्य न्यायमूर्ती एमआर शाह म्हणाले होते, “तुम्ही 27 सप्टेंबरसाठी तुमची ऊर्जा वाचवा.” त्याचवेळी खंडपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले होते, “प्रत्येकाने दोन पानी संक्षिप्त युक्तिवाद सादर करावा. पुढील सुनावणीत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App