प्रतिनिधी
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या अत्यंत महत्त्वाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता संपून शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले आहे, इतकेच नाही तर आत्तापर्यंत घटनाबाह्य सरकारचा ठपका लावणाऱ्या उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाच्या निकालातून चपराक बसली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच राजीनामा देणे देऊन पवारांच्या नियंत्रणाखालचे सरकार घालवले हे देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशातूनच स्पष्ट झाले आहे.Supreme Court dismissed bringing back MVA government in maharashtra
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे महाराष्ट्रात लोकशाहीचा आणि जनमताने दिलेल्या कौलाचा विजय झाला आहे, अशी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा जो काही निकाल आहे, त्यात चार-पाच महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छितो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस :
आमच सरकार कायदेशीर आहे हे सिद्ध झालं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आमच्यासोबत निवडून आलात. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्यावेळी उद्धव ठाकरे नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद करुन ठेवली होती?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
एकनाथ शिंदे :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App