नाशिक : दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही. Sunil tatkare and Prafulla Patel
– रायगड जिल्ह्यात सुनील तटकरेंना दणका
सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात मतदारांनी जोरदार धक्का दिला. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर सतत कुरघोडी करायचा प्रयत्न करणाऱ्या सुनील तटकरे यांना श्रीवर्धन, महाड आणि अलिबाग मधल्या मतदारांनी धक्का दिला. मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धनचे नगराध्यक्ष पद सुद्धा सुनील तटकरे यांना आपल्याकडे मिळवता आले नाही. तिथे भरत गोगावले यांच्या मदतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अतुल चौगुले विजयी झाले. सुनील तटकरे यांनी दिलेले उमेदवार जितेंद्र सातनाक यांचा पराभव झाला. महाडमध्ये भरत गोगावले यांनी सुनील कावीसकर यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले. सुनील तटकरे यांना सुदेश कळमकर यांना निवडून आणता आले नाही. अलिबाग मध्ये शेतकरी कामगार पक्षाने शिवसेनेशी हातमिळवणी करून सुनील तटकरेंच्या उमेदवाराचा पराभव केला.
दुसऱ्याच्या भांड्यात डोकावून पाण्याच्या आधी स्वतःचे भांडे साफ आहे का??, हे सुनील तटकरेंनी बघायला हवे होते, असा टोला भरत गोगावले यांनी हाणला.
– प्रफुल्ल पटेलांच्या उमेदवार चौथ्या क्रमांकावर
दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचे होम ग्राउंड असलेल्या गोंदिया नगर परिषदेत त्यांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवार माधुरी नाचरे यांना मतदारांनी चौथ्या नंबर वर ठेवले. तिथे काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांनी त्यांचा पराभव केला. प्रफुल्ल पटेल यांना आपल्या गावातच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणता आला नाही.
– गावातल्या मतदारांचा दणका
हे तेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहेत, ज्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रात स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण चालायचा प्रयत्न केला. प्रसंगी अजित पवारांना सुद्धा बाजूला सारून त्यांनी थेट भाजप नेतृत्वाशी संधान बांधले. हे नेते भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात राहिले. या संपर्काचा फायदा वापरून त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत आपल्याला हवे ते मिळवायचा डाव खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र प्रदेश भाजपने महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला सारले. मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीशी चर्चा नाही, अशी थांब भूमिका घेतली. तरी सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतून भाजपच्या नेतृत्वाकडून दबाव वाढविला. महाराष्ट्रात महायुतीमध्ये शिरकाव करायचा प्रयत्न केला, पण या दोन्ही “केंद्रीय” नेत्यांना त्यांच्याच गावांमधल्या मतदारांनी जोरदार दणका दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App