वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खिचडी घोटाळाप्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. Sujit Patkar of the Economic Offenses Branch has filed a case against many
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकरण सुमारे 6.37 कोटी रुपये असल्याचा तपासात समोर आले आहे. खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या नियोजन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांचाही आर्थिक गुन्हे शाखेने जबाब नोंदवला होता. संगीत हसनाळे नियोजन विभागाच्या इन्चार्ज असल्यानं खिचडीच्या टेंडरच्या फाईल्स त्यांनी हाताळल्या होत्या. सह्याद्री रिफ्रेशमेंटला कोटींचे खिचडीचे टेंडर देण्यात आले होते. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुजित पाटकर यांच्यासह सुनील बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App