निखिल वागळेंकडून वादावर पडदा; सुजात आंबेडकरांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाद मिटवला!!

प्रतिनिधी

मुंबई : पत्रकार निखिल वागळे विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांच्यातला वाद सोशल मीडियावर रंगून त्याने थेट जातीय वळण धारण केल्यानंतर निखिल वागळेंनी त्यांच्या बाजूने वाद मिटवण्याचे काल जाहीर केले होते. त्यानंतर आज सुजात आंबेडकर यांनी निखिल वागळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपल्याकडून वाद मिटल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी निखिल वागळे यांना वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन केले.Sujat Ambedkar wishes nikhil wagle a happy birthday, ends his fight against him



वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देत नाही. त्यामुळे वंचितची अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत होते, असा आक्षेप घेत निखिल वागळे यांनी वंचित बहुजन आघाडीला काही सल्ले दिले होते. त्यावर वंचित बहुजन आघाडीतूनही अनेक नेत्यांनी निखिल वागळे ट्रोल केले. निखिल वागळे विरुद्ध सुजात आंबेडकर असा वाद सोशल मीडियावर तुफान गाजला. निखिल वागळे यांनी सुजाता आंबेडकर यांना “चिल्लर”, असे संबोधणारे ट्विट केले आणि त्या वादाच्या आगीत तेल पडले. निखिल वागळे यांची ब्राह्मण जात काढण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. अनेक मान्यवर विचारवंतही सामील झाले. त्यामुळे निखिल वागळे यांना उद्वेग आला आणि त्यांनी आपल्या बाजूने आपण हा वाद थांबवत आहोत असे काल जाहीर केले होते.

त्यानंतर 24 तास उलटल्यानंतर सुजाता आंबेडकर यांनी निखिल वागळे यांचे पत्रकारितेतील योगदान मान्य करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्थापित राजकारणाला पर्याय देण्याच्या स्वतंत्र प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.

प्रस्थापित मीडियाला पर्याय उभे करण्यात निखिल वागळे हे महत्त्वाचे शिलेदार आहेत आणि राहतील. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र राजकारण आणि प्रस्थापित पक्षांच्या पंखाखाली न जाता स्वतंत्र संघर्षाला साथ द्यावी, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले आहे.

Sujat Ambedkar wishes nikhil wagle a happy birthday, ends his fight against him

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात