ठाकरे बंधूंच्या मराठी अजेंड्यावर सुजात आंबेडकर यांचा जोरदार प्रहार!!

Sujat Ambedkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठीचा अजेंडा पुन्हा एकदा पुढे रेटला. पण मराठी भाषा आणि अस्मितेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंची युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलखोल केली.Sujat Ambedkar exposed Thackeray brother’s Marathi agenda

सुजाता आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर सविस्तर पोस्ट लिहिली.

ती अशी :

– मराठी भाषा आणि अस्मिता हा ठाकरे बंधूंचा जुमला आहे यात फसू नका

🔷शिवसेनेची गेल्या २५ वर्षापासून मुंबईत सत्ता आहे असे असताना सुद्धा मराठी माणूस हा मुंबईतून हद्दपार का झाला?

🔷6 डिसेंबरला चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक मोठ्या संख्येने जातात म्हणून राज ठाकरे आणि त्यांचे नातेवाईक घरे बंद करून फिरायला का जातात?



🔷बाबासाहेबांना अभिवादन करायला येणारे लोक मराठी नाहीत का?

🔷हेच मनुवादी लोक फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांना जातीवादी वृत्तीने का हिनावतात?

🔷आता त्यांना मते पाहिजे म्हणून मराठी अस्मितेचा मुद्द्यावर एक करण्यासाठी काम करत आहे पण यांचा जातीवाद विसरू नका.

🔷खैरलांजी प्रकरणात ज्या भोतमांगे कुटुंबावर हल्ला झाला अत्याचार झाला ते कुटुंब मराठी होते आणि हल्ला करणारे मराठी होते.

🔷भीमकोरेगावमध्ये ज्यांच्यावर हल्ला झाला ते मराठी होते. तसेच हल्ला करणारे मनोहर भिडेचे लोक हे देखील मराठी होते.

🔷नांदेडमध्ये सक्षम ताटे याला मारण्यात आले. सक्षम ताटे मराठी होता आणि त्याला मारणारे लोक सुद्धा मराठी होते.

🔷गावात पहिली भीमजयंती काढली म्हणून अक्षय भालेरावचा नांदेडमध्ये खून झाला. अक्षय भालेराव मराठी होता. त्याला मारणारे लोक मराठी होते.

🔷नितीन आगे प्रेमप्रकरणात त्याची हत्या करण्यात आली. नितीन आगे सुद्धा मराठी होता त्याला मारणारे लोक मराठी होते.

🔷हा भाषावादाचा मुद्दा आपला नाही. आपला मुद्दा हा भारतातला महाराष्ट्रातला जातीवाद अंत करण्याचा आहे.

🔷उद्धव ठाकरेच्या वडिलांनी वक्तव्य केले होते की, घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ हे वक्तव्य मराठीच्याच विरुद्ध केले होते. हे वक्तव्य मराठीच भाषेत केले होते. असे जातीवादी वक्तव्य करतात आणि जेव्हा मते पाहिजे असतात तेव्हा मराठी अस्मितेचा नावाखाली एक करण्याचे काम करता.

🔷स्वतःचा संपलेला पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मराठी अस्मितेचा जुमला आणलेला आहे.

Sujat Ambedkar exposed Thackeray brother’s Marathi agenda

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात