”…त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे पत्र लिहून यातून कोणाची सुटका होईल’’ विरोधकांनी मोदींना पाठवलेल्या पत्रावर फडणवीसांचं विधान!

Devendra Fadnvis New

‘’ज्याने चूक केली त्याची चौकशी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर…’’ असंही म्हणाले आहेत.

प्रतिनिधी

विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय यंत्रणांचा विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात गैरवपार होत  असल्याचे पत्र लिहिले. ‘’विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा उघडपणे गैरवापर केला जात असून आपण लोकशाहीकडून निरंकुश हुकूमशाहीकडे वाटचाल केली असल्याचे त्यातून स्पष्ट होते.’’ असा आरोप करणारे हे पत्र आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. Such letters cannot stop the action against corruption and illegal activities Fadnavis statement on the letter sent to Modi by the opposition

अमरावतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘’मला असं वाटतं की यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही. मोदींच्या राज्यात जे कोणी गैरमार्गाने पैसे कमावत आहेत, गैरकारभार करत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या यंत्रणा करत आहेत आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही.’’


‘’उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात’’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!


याचबरोबर ‘’त्यामुळे मला वाटत नाही अशाप्रकारे असं कुठलं पत्र घेऊन किंवा पत्र लिहून यातून कोणाची सुटका होणार आहे. यावरचा उपाय एवढाच आहे, की हा भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा हे सगळं त्यांनी बंद केला पाहिजे.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं.

विरोधी पक्षांचे जे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांच्याविरुद्ध तपास यंत्रणा कशा संथपणे कारवाई करतात याकडे लक्ष वेधण्यासाठी या पत्रात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, तृणमूल काँग्रेसचे माजी नेते सुवेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय यांची उदाहरणे देण्यात आली आहेत.  यावर फडणवीसांनी सांगितलं की, ‘’असं त्यांनी उदाहरण दाखवावं की भाजपामध्ये आले म्हणून कोणाची चौकशी बंद झाली. कोणाचीही चौकशी बंद होत नाही, भाजपामध्ये असो किंवा कुठेही असो. ज्याने चूक केली असेल त्याची चौकशी होईल आणि एखाद्यावर जर चुकीची कारवाई झाली असेल तर न्यायालय आहे. न्यायालय त्यासंदर्भात निश्चितपणे न्याय देईन.’’

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याची विरोधी पक्षच्या नेत्यांनी जरी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली असली, तरी काँग्रेस, द्रमुक आणि डावे पक्ष मात्र या पत्रापासून दूर असल्याचे दिसून आले.

पंतप्रधानांना पत्र पाठवणाऱ्या नऊ नेत्यांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (भारत राष्ट्र समिती), बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (राजद), ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे प्रमुख फारुक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (आप) यांचा समावेश असून त्यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.

Such letters cannot stop the action against corruption and illegal activities Fadnavis statement on the letter sent to Modi by the opposition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात