विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र त्यासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. Students, don’t worry, you can apply for class XII till the day before the exam
राज्यात कडक निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील अनेक यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नसावा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसलीही चिंता न करता पुढील काळात आपला परीक्षा अर्ज भरावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra SSC exam cancelled : अखेर दहावीची परीक्षा रद्द ; बारावीची परीक्षा होणारच !
बारावीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार योजनेतील आणि खासगी विद्यार्थ्यांना अतिविशेष व अतिविलंब परीक्षा शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २२ एप्रिलपर्यंत देण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही, तर त्यांनी अधिक शुल्क भरून त्याची सोय करून देण्यासाठी असा निर्णय घेतला असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App