एसटीचा संप अधिक चिघळला; एकूण २०५३ कर्मचारी निलंबित; आज एका दिवसात ११३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप कर्मचाऱ्यांचा संप अधिकच चिघळला असून एसटी महामंडळाने कर्मचारी निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. ST’s strike simmered more

एसटी महामंडळाने संप सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकूण 2053 कर्मचारी निलंबित केले असून यापैकी 1135 कर्मचाऱ्यांना आज एका दिवसात निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती महामंडळाच्या पीआरओने अधिकृतरीत्या दिली आहे.

दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना या संपात मध्यस्थी करण्याची विनंती केली. यावेळी राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मी मध्यस्थी करेन पण कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्या करता कामा नये याची हमी द्यावी, असे ते कर्मचाऱ्यांना म्हणाले.

 

एसटी कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने एका पाठोपाठ एक नोटिसा पाठवून आज 1135 कर्मचारी निलंबित केले आहेत. एकीकडे संपावर तोडगा काढण्याची भाषा सरकारकडून होत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांशी मात्र सरकार कठोरपणे वागताना दिसत आहे. त्याच वेळी खासगी बस वाहतूकदारांनी जी मोठ्या प्रमाणावर भाडेवाढ करून प्रवाशांची लुबाडणूक चालू केली आहे त्यावर मात्र महाविकास आघाडी सरकारला परिणामकारकरित्या प्रतिबंध घालता आलेला नाही.

ST’s strike simmered more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात