वीज कर्मचाऱ्यांचा संप; महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये परिणाम

प्रतिनिधी

मुंबई : महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत मध्यरात्री 3.00 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागांत हेच चित्र आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी 72 तासांचा हा संप सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत. strike of electricity workers; Results in several districts in Maharashtra

बदलापूर, अंबरनाथच्या काही भागांत मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच बत्तीगुल झाली आहे. बदलापूरच्या बेलवली, मांजर्ली, अंबरनाथच्या चिखलोली, सर्वोदयनगरसह इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ- बदलापूरमधील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. इन्व्हरटरही बंद झाल्याने, अनेकांची गैरसोय झाली आहे.

सातारा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी वीजपुरवठा बंद आहे. मध्यरात्री 3.00 वाजल्यापासून वीजपुरवठा बंद आहे. महावितरणच्या कर्मचा-यांच्या आंदोलनाला सुरुवात झाल्याने साताऱ्यातील बत्तीगुल झाली आहे.

नागपुरात रात्री 12.00 वाजता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संप पुकारला. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातील कर्मचारी संपावर गेले आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे. सन सिटी, सिंहगड रोड, शिवणे भागातील वीज मध्यरात्रीपासून गायब झाली आहे. वाशिम शहरातील विद्युत पुरवठा मध्यरात्री 1.00 वाजता खंडित झाला. अचानक वीज गेल्यामुळे सर्व शहर अंधारात बुडाले. वाशीम शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

strike of electricity workers; Results in several districts in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात