फैजपूरमध्ये “द केरल स्टोरी” दाखविणाऱ्या श्रीराम टॉकीजवर दगडफेक; गुंडांवर कठोर कारवाईसाठी खासदार रक्षा खडसेंची फडणवीसांकडे तक्रार

प्रतिनिधी

जळगाव : लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांच्या संबंधांवर झगझगीत प्रकाश टाकणारा “द केरल स्टोरी” सिनेमा दाखविणाऱ्या फैजपूर यावल येथील श्रीराम टॉकीजवर समाजकंटकांनी दगडफेक केली. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्यक्ष श्रीराम टॉकीजला भेट देऊन किती पाहणी केली आणि समाजकंटकांवर कारवाईसाठी ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. Stone plenting on shriram talkies faizpur yaval while screening the kerala story

त्यांनी पोलीस स्टेशन मधूनच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री गिरीष महाजन आणि पोलीस अधिक्षकांना फोन लावून प्रत्यक्ष घटनाक्रम त्यांच्या कानावर घातला.

मौजे फैजपूर (यावल) येथील श्रीराम टॉकीज मध्ये “द केरला स्टोरी” हा बहुचर्चित चित्रपट ३ दिवसापूर्वी चालू असताना काही समाजकंटाकांनी चित्रपट गृहाच्या पत्र्याच्या छतावर तुफान दगडफेक केली होती, यावेळी चित्रपट गृहात मोठ्यासंख्येने उपस्थित महिला वर्ग घाबरून, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

मात्र तीन दिवस उलटून सुद्धा या समाजकंटाकांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. तेव्हा स्थानिक नागरिकांनी फैजपूर पोलीस स्टेशन येथे आंदोलन केले असता, आज फैजपूर येथे भेट देऊन गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध लावून कठोर कार्यवाही करणे बाबत संबंधित स्थानिक पोलीस प्रशासनास सूचना केल्या. दगडफेकीची घटना घडलेल्या श्रीराम टॉकीज येथे पाहणी करून माहिती घेतली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीषजी महाजन आणि जळगांव पोलीस अधिक्षक यांना सदर घटनेची दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली. स्थानिक पोलिसांची तक्रार करून तत्काळ उचित कार्यवाही करण्याची मागणी केली, असे रक्षा खडसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Stone plenting on shriram talkies faizpur yaval while screening the kerala story

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात