प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाने आता कायदेशीर वळण पकडले आहे. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यावर ठाकरे – पवार सरकारने आता या विषयाकडे कायद्यानुसार हाताळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सैनिकही मशिदींच्या विरोधात पोलिसात तक्रारी करू लागले आहेत. Still unaware of the buzzing from Mahim’s mosques
मनसेचे दादर विभागाचे प्रमख यशवंत किल्लेदार यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवले आहे. त्यात माहीम विभागातील मशिदींवर संध्याकाळी भोंगे लावून अजान पठण केले जात आहे, अशा तक्रारी मनसेकडे आल्या आहेत. या मशिदींवर आधी कारवाई करावी, अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे. मनसेकडून याबाबतचे पत्र माहीम पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. 4 मे रोजी सकाळी भोंग्यावर अजान झाली नाही. पण संध्याकाळी भोंग्याचा वापर झाला. पुन्हा न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे. याप्रकरणी काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
राज ठाकरे यांनी सुद्धा अजून काही मशिदींवर अजान भोंग्यावर होते, असे म्हटले होते. त्यामुळे आता मनसेनेही भोंगा विरोधी आंदोलन कायद्याच्या दृष्टिकोनातून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सैनिक आता मशिदींच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करत आहेत, अशा रीतीने मनसे आता पोलिसांच्या मदतीने मशिदींना टार्गेट करत आहे. तसेच आता मनसे नेते मशिदींवरील भोंग्यांवर अजान वाजली तर पोलिसांना 100 नंबर डायल करून तक्रार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App