राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

नागपूर : राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे जात नाहीये. देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्व निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.

नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना , देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने चहापानाचा कार्यक्रम होता आणि विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला, त्यामुळे आम्हाला आमचा चहा प्यावा लागला. आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशाजनक आणि त्रागा करणारी होती. खरे म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. भास्कर जाधव यांनी विजय वडेट्टीवार यांच्या मइकची बॅटरी बंद केली. भास्कर जाधव यांना अजून एक उपरती झाली की कॉंग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होती. होतीच म्हणाले ते आहे असे नाही म्हणाले, त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती माहित आहे. तसेच शरद पवार गटाची त्यांच्या पत्रकावर नाहीये.



फडणवीस म्हणाले, विजय वडेट्टीवार एकदम जोरात होते त्यांनी विदर्भावर भाष्य केले. मला त्यांना सांगायचे आहे की 2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा विदर्भ त्यांनी बघावा. त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो. आताच गडचिरोली जिल्हा आणि पूर्वीचा जिल्हा जर त्यांनी बघितला तर त्यांनाही लक्षात येईल. एकूण आपण बघितले तर विरोधकांनी सरकारवर अनेक मुद्यांवरून टीका केली आहे. राज्य दिवाळखोर झाले असे दाखवण्याची घाई त्यांना झालेली आहे. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की, राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरी कडे जात नाहीये. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वा निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.

शेतकऱ्यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर 92 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. 8 टक्के जे शेतकरी आहेत त्यांच्या केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत. त्यांना देखील आपण पैसे देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत असे म्हणणे म्हणजे अभ्यास न करता केलेले विधान आहे. शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे मदत दिलेली आहे. एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. खरे म्हणजे मुळातच मला असे वाटते की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे. मुद्दे सुद्धा नाहीत आणि मुद्दे रेटण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा शक्ती देखील विरोधी पक्षात दिसत नाही. नागपूरच्या अधिवेशनात शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट होते. त्यामुळे कामकाजाचे तास कुठेही कमी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

State’s Finances Under Stress but Nowhere Near Bankruptcy, Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात