विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकणातील पूरग्रस्त भागातील गावांची परिस्थिती अतिशय भीषण आहे. मोठे नुकसान झाले आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Stand firmly behind the villages those Affected by flood : Devendra Fadanvis
फडणवीस म्हणाले, कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्याचा प्रारंभ रविवारी तळिये या गावांतून केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांच्यासोबत केला.माझे सहकारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सुद्धा सोबत होते. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावांत झालेले नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App