वृत्तसंस्था
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी तीन महिन्याहून अधिक काळ विलीनीकरणासाठी संप पुकारला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी विलिनीकरबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. ST merger re-hearing today; Look at the hearing of the passengers with the staff
मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. २२ डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता. या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं.
दोन आठवड्यांनी या आंदोलनवर तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले आणि आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App