एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचा विचार, १६ मागण्यांवर सरकार सकारात्मक

विशेष प्रतिनिधी

मुंबई: एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग देऊ नविलिनीकरण सदृश्य लाभ देण्याचा विचार सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या एकूण 18 मागण्यांवर चर्चा झाली. त्यातील 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे.ST employees will get 7th pay commission, the government is positive on 16 demands

परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबतची घोषणा विधानसभेत करणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय गेल्या दीडएक महिन्यापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संपही उद्याच मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.



दरेकर म्हणाले, काल विधिमंडळ सभागृहात एसटी संपाबाबत मी सरकारचं लक्ष वेधलं होतं. विलीनीकरण शक्य नाही असं सरकार म्हणतंय. कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. आपण यावर सुवर्णमध्य काढावा असं मी म्हटलं होतं. सभापती महोदयांनी त्याबाबत आज तातडीने बैठक बोलावून एक कमिटी गठीत केली.

सरकार उद्या याबाबत आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतील आणि त्याची माहिती सभागृहाला देतील.आजच्या बैठकीला मी स्वत: होतो. एसटी कामगारांचे नेते आणि प्रतिनिधी होते.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी 18 मुद्दे मांडले. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. यातील 18 पैकी 16 मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मकता दर्शवली आहे. विलीनीकरण झाल्यावर जे लाभ द्यायचे आहेत, ते विलीनीकरण सदृश्य लाभ एसटी कामगारांना देण्यात येणार आहे.

ST employees will get 7th pay commission, the government is positive on 16 demands

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात