प्रतिनिधी
नाशिक : कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. संस्कृत पदविका परीक्षेत नाशिकच्या श्रीराम संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जोरदार बाजी मारली. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही श्रीराम संस्कृत महाविद्यालयाचा निकाल 100% लागला असून सलग चवथ्या वर्षीही श्रीराम संस्कृतचे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. दरवर्षी श्रीराम संस्कृतचे विद्यार्थी सुवर्णपदक पटकावतात. यामागे आहे प्रचंड मेहनत, सातत्य आणि प्राचार्य अतुल तरटे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मोलाचे ठरते. Sriram Sanskrit Kendra 100% Success in Kavikulguru Kalidas Sanskrit University Summer Exams
श्रीराम संस्कृतचे वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयात संस्कृत शिकण्यासाठी वयाची अट नाही, संस्कृतचे पूर्व ज्ञान असण्याची देखील अट नाही. कोणत्याही वयातील पुरुष, महिला, युवक, युवती, उद्योग-व्यवसाय करणारे असो वा नोकरी करणारे किंवा गृहिणी कोणीही श्रीराम संस्कृतमधे प्रविष्ट होऊ शकतात. त्यांना संस्कृतच्या बाराखडी पासून अत्यंत सुलभ पद्धतीने प्रा. अतुल तरटे यांचे मार्गदर्शन लाभते.
यंदाही शुभांगी पाथरूडकर जोशी (83.50%) व सीमंतिनी देसाई (82%) या गृहिणी क्रमशः पहिल्या आणि दुसऱ्या आल्या आहेत, तर शिक्षण सोडून बराच कालावधी झालेले डॉ. संजय सबनीस (79.50%) तृतीय आले आहेत. स्वतःचे मेडिकल दुकान चालवणाऱ्या अनघा देशपांडे 79% गुण मिळवीत चवथ्या क्रमांकावर आहेत.
कोविडमुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून अभ्यास करून परीक्षा मात्र शासनाच्या निर्देशानुसार ऑफलाईन पद्धतीने देत घवघवीत यश संपादित केले.
केवळ नाशिककच नव्हे तर विश्वातून कोठूनही शिकू इच्छिणाऱ्या संस्कृत प्रेमींसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून देववाणी संस्कृत शिक्षणाचे कार्य श्रीराम संस्कृत महाविद्यालयात सुरू असून नाशिकमधील संस्कृत शिक्षणाचे व संशोधनाचे प्रगत केंद्र म्हणून श्रीराम संस्कृत महाविद्यालय सुख्यात आहे। डिप्लोमा,स्पोकन संस्कृत, BA संस्कृत विशारद, MA संस्कृत साहित्य, गीता, उपनिषदे, वैदिक व पौराणिक स्तोत्र वर्ग, असे संस्कृतचे शिक्षण वय 16 ते 60 च्या सर्व व्यक्तींना येथे उपलब्ध होते. संस्कृत शिकण्यासाठी उत्सुकांनी प्रा. अतुल तरटे (9850037263) यांच्याशी मोहिनीदेवी रुंगटा विद्यालयात रविवारी संध्याकाळी 4 ते 6 यावेळेत प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App