वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना ठाकरे सरकारने केली आहे. Special Task Force Of Paediatricians Set Up For The Third Wave Of Corona
विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. टास्क फोर्समध्ये १३ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ञांशी संवाद साधून तिसरी लाट आल्यास मुलांच्या उपचाराबाबत चर्चाही केली होती. मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ञांचा सदस्य समावेश करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App