विशेष प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्वकाही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.Suresh Dhas
सुरेश धस यांनी बुधवारी कृषि खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र लिहून कृषि खात्यातील कथित घोटाळ्याचा अहवाल मागवला. त्यांनी हा तहब्बल 169 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणासह महादेव मुंडे हत्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबासह उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्याची मला माहिती आहे. त्या माऊलीची काय चूक आहे? 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली. पण अद्यापही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. आत्ता विष पिऊनही झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांना भेटण्याची वेळ दिली आहे. निश्चितपणे ते त्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडतील. त्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.Suresh Dhas
बीड तुरुंगात एक स्पेशल फोन सापडला
रोहित पवारांनी मंगळवारी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आका (वाल्मीक कराड) व आकाची टोळी ती आत्ताही सक्रिय असल्याचा आरोप केला. पत्रकारांनी याविषयी सुरेश धस यांना छेडले असता त्यांनी आपण हा मुद्दा यापूर्वी अनेकदा मांडला असल्याचे स्पष्ट केले. मी यावर यापूर्वी बऱ्याचवेळा बोललो. त्यामुळे आता बोलणार नाही. परंतु जेलमधून एक स्पेशल फोन सापडला आहे. विनंती एकच राहील. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तो जो छोटो फोन आका वापरत होते, त्या आकाने जो फोन वापरला आहे, त्याचे डिटेल्स घेतले तर यातील सर्वकाही बाहेर पडेल. महादेव मुंडे यांचे प्रकरण सुरूवातीला मी स्वतः काढले होते. तत्पूर्वी, कुणीही या प्रकरणात नव्हते. सर्वात अगोदर मी बोललो होतो, असे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर तोंडावर बोट
अजित पवारांनी कृषि घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यामुळे माजी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेत. सुरेश धस यांनी यावरही भाष्य केले. पण त्यांनी हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा असल्याचे ते म्हणाले. मी त्या मुद्यावर बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु या बाबतीत प्रकाश साळुंके बोलले आहेत. त्या क्लीन चिटच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत, असे ते म्हणालेत.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम राखत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. सुरेश धस यावर बोलताना म्हणाले की, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो निर्णय घेतील. एवढ्या मोठ्या प्रकरणावर मी बोलणे उचीत ठरणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App