SP NCP : आली पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी; पंढरपूर मध्ये काँग्रेसच्या जागेवर “घुसखोरी”!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पाचवी यादी; यातून केली पंढरपूर मध्ये काँग्रेसच्या जागेवर घुसखोरी!!, असे घडले आहे पवारांच्या राष्ट्रवादीने पाचवी यादी जाहीर केली. त्यामध्ये 5 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकूण उमेदवारांची संख्या 87 झाली आहे.

पवारांनी माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील, मुलुंड मधून संगीता वाजे, विदर्भातील मोर्शीतून गिरीश कराळे, पंढरपूर मधून अनिल सावंत, तर मोहोळ मधून राजू खरे यांना उमेदवारी दिली आहे.

यापैकी मोहोळ मध्ये कालच त्यांनी सिद्धी रमेश कदम यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रमेश कदम अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या इकडे कोटींच्या घोटाळ्यात तुरुंगात जाऊन सध्या जामिनावर बाहेर आले असल्याने तो विषय राष्ट्रवादीच्या प्रचारावर दुष्परिणाम करणारा ठरू शकतो, असे लक्षात आल्यावर सिद्धी रमेश कदम यांचे तिकीट कापून राजू खरे यांना दिले.

पण त्याचबरोबर पाचव्या यादीतून पवारांच्या राष्ट्रवादीने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जागेवर घुसखोरी केली काँग्रेसने तिथे हाताचा पंजा या चिन्हावर आधीच भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे, पण पंढरपूर मधून पवारांनी तुतारीवर अनिल सावंतांना उतरवून काँग्रेसच्या विरोधात “डाव” टाकला आहे.

SP NCP new candidate list

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात