Somnath Suryavanshi : हायकोर्टाचे निर्देश; सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी चौकशी समिती बरखास्त; 1 आठवड्यात SIT स्थापन करा

Somnath Suryavanshi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Somnath Suryavanshi मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालकांना एका आठवड्याच्या आत विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली आहे. हा सरकारसाठी एक झटका मानला जात आहे.Somnath Suryavanshi

परभणी शहरात गतवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. नंतर सोमनाथ यांचा कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत कोर्टाने पोलिस महासंचालकांना या प्रकरणी एका आठवड्याच्या आत एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले.Somnath Suryavanshi



एका आठवड्याच्या आत एसआयटी स्थापन्याचे आदेश

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला. त्यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना न्यायालयात घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या खटल्याची सुनावणी झाली. त्यात कोर्टाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना (डीजीपी) एका आठवड्याच्या आत या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली चौकशी बरखास्त केली जाईल आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नवीन तपास पथकाने सुपूर्द केली जातील.

विशेषतः याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना विशेष तपास पथकाच्या सदस्यांवर काही आक्षेप असतील तर त्या न्यायालयात आपला आक्षेप नोंदवू शकतात, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

सरकारने गुन्हेगार पोलिसांसाठी स्वतःला पणाला लावू नये

आंबेडकर म्हणाले, कोर्टाने याचिकाकर्त्यांना मुभा दिली आहे की, त्यांना चौकशीत काही गडबड वाटत असेल तर त्यांनी दंडाधिकारी किंवा सेशन कोर्टात अर्ज करून तक्रार दाखल करावी. कोर्टाने सरकारने केलेल्या कामावर नाराजीही व्यक्त केली आहे. तसेच याचिकेतील इतर मुद्यांवर शपथपत्र व उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत.

सोमनाथला कोठडीत मारण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील सहआरोपींचे स्टेटमेंट होईपर्यंत व किती पोलिस त्याला मारण्यात सहभागी होते, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या प्रकरणातील आरोपी निश्चित होणार नाहीत. आम्हाला याची पूर्वीपासूनच कल्पना आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता साक्षीदारांना फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात होईल. पण साक्षीदार फुटले नाही, तर यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल असा मला विश्वास आहे.

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सरकारला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसांना पाठिशी न घालण्याचाही सल्ला दिला. माझे सरकारला एवढेच सांगणे आहे की, पोलिस विभागात काही माणसे ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत. या गुन्हेगार लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला पणाला लावू नये. त्यांनी सुप्रीम कोर्टातही स्वतःला पणाला लावले होते. माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना वाचवण्याच्या भानगडीत पडू नये, असे आंबेडकर म्हणाले.

High Court Orders SIT Investigation Somnath Suryavanshi Death

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात