‘’काही संस्था आहेत, काही लोक आहेत की जे…’’असंही फडणवीस म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नुकतीच अकोल्यात दंगल घडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये मोठ्याप्रमाणावर नुकसानही केलं गेलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर आरोप केला आहे. Someone is deliberately trying to disrupt law and order in Maharashtra Devendra Fadnavis statement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘’जसं आम्हाला लक्षात आलं की काही लोक सामाजिक शांतात भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, पोलीस कुमक तत्काळ त्या ठिकाणी पोहचली आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आणली गेली आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की.’’
महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना सातत्याने का घडत आहेत? यावर फडणवीस म्हणाले, ‘’हे १०० टक्के जाणूनबुजून होतय. याला कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत आणि अशाप्रकारे जे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही.’’
🕛 12 noon📍 Pune | दु. १२ वा 📍 पुणेMedia interaction#pimprichinchwad #Chinchwad #Pune https://t.co/aVQ8eKHFYY — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 15, 2023
🕛 12 noon📍 Pune | दु. १२ वा 📍 पुणेMedia interaction#pimprichinchwad #Chinchwad #Pune https://t.co/aVQ8eKHFYY
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 15, 2023
याशिवाय, ‘’या दंगली काहीप्रमाणात नक्कीच राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. काही संस्था आहेत, काही लोक आहेत की जे मागून याला कुठतरी आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सगळं बाहेर आणलं जाईल.’’ असंही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App