प्रतिनिधी
चंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे पण इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे समाधान केले आणि त्यांच्या पुढाकारात रवींद्र टोंगे यांनी 21 दिवसांनी आज उपोषण सोडले. Solution to the OBC agitation at the initiative of devendra Fadnavis
आपण मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापन केली, याची आठवण फडणवीसांनी करून दिली.
मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते. दरम्यान काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघाने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी आणि विजय बल्की उपोषण सोडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
राज्य सरकार ओबीसी समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकारने ओबीसी समाजालासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले. ओबीसींच्या कोणत्याही मुद्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नसल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दोन समाजात वाद होऊ देणार नाही
ओबीसींच्या कोणत्याही मुद्यावर सरकार नकारात्मक नाही. मराठा समाजालाही आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दोन्ही समाजात वाद निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App