एक-दोन दिवसांपासून थांबलेल्या चालकांना फाउंडेशन कडून फराळ मिळाल्यावर त्यांना आनंद वाटला.Solapur: On behalf of MK Foundation, Diwali Faral was distributed to sugarcane workers and drivers
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सण सर्वात मोठा सण मानला जातो. शेतकऱ्यांच्या शेतीतील ऊस रात्रंदिवस तोडणारे ऊस कामगार आणि तोडलेली ऊस वेळेवर पोहचवणारे ऊस वाहक तसेचगाडीचे चालक यांच योगदान खूप मोलाचे असते.
दरम्यान सणासुदीच्या दिवसांमध्ये श्री.सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या ऊस तोड कामगार आणि चालक यांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी सोलापुरातील एम.के.फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने , संचालक गणेश कट्टीमनी यांच्या सहकार्याने तसेच एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या मार्गदर्शनानुसार फराळ वाटप करण्यात आला.
एक-दोन दिवसांपासून थांबलेल्या चालकांना फाउंडेशन कडून फराळ मिळाल्यावर त्यांना आनंद वाटला.यावेळी फाउंडेशनचे संचालक संतोष उकरंडे, विशाल धोत्रे,श्रीशैल हिप्परगी आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App