विशेष प्रतिनिधी
पुणे : बंधुतेच्या मार्गानेच समाजात समता प्रस्थापित करता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या याच बंधुतेच्या मूल्याची समाजाला गरज आहे, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी व्यक्त केले. सामाजिक समरसता मंचाने आयोजित केलेल्या बंधुता परिषदेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३९ च्या एप्रिल महिन्यात पुण्यात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिली होती. त्याच पेरू गेट भावे हायस्कूलमध्ये सामाजिक समरसता मंचाने बंधुता परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी किशोर मकवाना, आयडीबीआय आणि इंडियन बँकेचे माजी अध्यक्ष किशोर खरात, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, खासदार बाळासाहेब साळुंके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष कश्यप साळुंके, भंते बुधभूषण उपस्थित होते.
किशोर मकवाना म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला भेट दिल्याचे माहिती होते. मात्र, आज प्रत्यक्ष या भेटीचा ऐतिहासिक संदर्भ मांडला गेला. डॉ. आंबेडकरांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली नाही. उलट संघाकडे ते आपलेपणाच्या भावनेने पाहत होते. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या बंधुतेच्या संदेशाचे स्मरण या परिषदेच्या निमित्ताने होत आहे.”
समरसता गतिविधीचे क्षेत्र संयोजक निलेश गद्रे, पुणे महानगर संयोजक शरद शिंदे, समरसता मंचाचे संयोजक मनोज भालेराव यावेळी उपस्थित होते. किशोर खरात यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. बंधुता गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रवी ननावरे यांनी सामाजिक समरसता मंचाची माहिती दिली. सुनील वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. भंते बुधभूषण यांनी बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सांगता केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App