प्रतिनिधी
मुंबई : अंदमान-निकोबार बेट समूहाच्या दक्षिणेकडील भागात धडकलेला मान्सून तेथेच 3 दिवसांच्या मुक्कामी आहे. शुक्रवारी मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानच्या इंदिरा पॉइंट म्हणजेच नानकोव्हरी बेटापर्यंत पोहोचला. परंतु सोमवारपर्यंत त्यात प्रगती झाली नाही. सामान्यपणे मान्सून 21 मेपर्यंत पोर्टब्लेयरला दाखल होतो. परंतु तूर्त तरी मान्सून उत्तरेकडील पोर्टब्लेयर सीमेपासून सुमारे 415 किमीवर आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भासह राज्यातील काही भागांत २४ व २५ मे रोजी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.Slow movement of monsoon, stay in Andaman-Nicobar Island; Rain in some parts including Vidarbha on May 24
मान्सूनचे अपेक्षित वारे नाही. ते क्षीण स्वरूपात आहे. परंतु २ दिवसांत मंदगतीने मार्गक्रमण करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. उत्तर भारतात मंगळवारपासून सक्रिय पश्चिमी विक्षोभ धडकेल. यास अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतायुक्त हवेने आणखी बळ मिळेल.
मध्य प्रदेशात गारपीट, झारखंडमध्ये उष्णतेची लाट
विदर्भाकडील भागात २४ व २५ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल. काही ठिकाणी गाराही पडू शकतात. मराठवाड्यात आर्द्रतेसह प्रचंड उकाडा जाणवू शकतो. बिहार व पश्चिम बंगालमध्ये २३ मे रोजी जोरदार पाऊस होऊ शकतो. केवळ झारखंडच्या काही भागात मंगळवारी उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते. ओडिशा, आंध्र किनारपट्टीत उष्णता जाणवू लागेल.
उष्णतेने होरपळणाऱ्या उत्तर भारताला मिळणार दिलासा
गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेने होरपळणाऱ्या उत्तर भारताला दिलासा मिळू शकतो. आगामी ४ दिवस जम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थानात विजेच्या कडकडाटासह गारांचाही पाऊस पडू शकतो. बुधवार, गुरुवारी उत्तर भारतात दिवसा सामान्य तापमानामध्ये 4 ते 5 अंश सेल्सियसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App