विशेष प्रतिनिधी
मुंबई : वेड्या बहिणीची वेडी माया म्हणतात याचा प्रत्यय पंकजा मुंडे यांच्याकडून आला. धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यावर पंकजा यांनी आई आणि बहिणीसह त्यांची भेट घेतली. काळजी, दगदग करू नको, तब्येतीला जप. शेवटी तब्येत महत्त्वाची आहे, असा सल्ला पंकजा यांनी त्यांना दिला.Sister’s love, don’t worry, chant for health, Pankaja’s advice to Dhananjay Munde
बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण-भावांत सतत संघर्ष सुरू आहे. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत, अशी टीका पंकजा यांनी केली होती. धनंजय मुंडे यांनीही वारंवार पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, धनंजय यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी ऐकल्यावर पंकजा बहिण आणि आईसह तातडीने त्यांना भेटायला गेल्या.
धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दिवसभर अनेक नेते मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेत त्यांची विचारपूस केली.सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मात्र, हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.त्यानंतर काही वेळात धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनीही रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत आई आणि दोन्ही बहिणीही होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App