मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Single Window App मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पीकविमा योजना आणि ई-पीक पाहणीच्या बैठकीत कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुदधीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एकत्रित सेवा ॲप (सिंगल विंडो ॲप) आणि संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.Single Window App
यावेळी मुख्यमंत्री यांनी पुढील निर्देश की, माती विश्लेषण, कीटक व रोग व्यवस्थापन, पुरवठा साखळी आणि हवामान अंदाजासाठी एआय (AI) तंत्रज्ञान विकसित करा. कृषीमधील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन नवकल्पनांना चालना द्या. केंद्र शासनाच्या ‘साथी पोर्टल’ महाराष्ट्रासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करून शेतकऱ्यांना सत्यतादर्शक बियाणे विक्री व वितरणाची सुविधा लवकर उपलब्ध करा.
तसेच, कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी खाजगी क्षेत्राकडून ज्ञान हस्तांतरित करण्यावर भर देऊन कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करा. ई-पीक पाहणी ॲपमध्ये आवश्यक ते बदल करून अधिक प्रभावी बनवा. राज्य आणि केंद्र शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. चालू योजनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास तातडीने सुधारित प्रस्ताव सादर करा. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांसह अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App