विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा आज शुभारंभ झाला. वरळीच्या जांभोरी मैदानावर आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ अश्विनी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. Shri Chhatrapati Shivaji Maharaj Traditional Sports Mahakumbh Tournament started today
छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. या स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध करुन देण्यात येणार असून स्पर्धेसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही राज्य सरकारमार्फत करण्यात आली आहे. उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
जुन्या पारंपारिक खेळांना चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांना या खेळाची माहिती मिळावी या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक खेळ महाकुंभ स्पर्धा मुंबई महानगर पालिकेच्या शाळांच्या मैदानांवर तसेच सभागृहात आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत विविध १६ खेळांचा समावेश करण्यात आला असून त्यात लेझीम, लगोरी, लंगडी, रस्सी खेच, दंड बैठका, विटी दांडू, दोरीच्या उड्या, पंजा लढवणे, मल्लखांब, खो-खो, कबड्डी, आखाडा-कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर सौष्ठव, ढोल-ताशा यांचा समावेश आहे. २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App