लव्ह जिहाद : अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शिझान खानला पोलीस कोठडी

वृत्तसंस्था

मुंबई : लव्ह जिहाद केसमधून टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अभिनेता शिझान मोहम्मद खानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिझानला पोलीसांनी आज न्यायालयात हजर केले आणि त्याच्या चौकशी, तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने त्याला 28 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शिझानचे वकील शरद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  Shizan Khan in police custody on charges of inciting actress Tunisha Sharma to commit suicide

शिझान खानने तुनिषाला प्रेमाच्या जाळयात ओढले. शिझानपासून तुनिषा शर्मा गरोदर असल्याचे आरोप करण्यात आले होते. ती त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरत होती. पण त्याने लग्नाला नकार दिला, अशी माहिती आहे.

शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली होती. तुनिषाच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत. तिची काकू परदेशात राहत असल्याने तिला यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार उद्या किंवा परवा होतील.

तुनिषाचे मामा पुढे म्हणाले,”तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. तुनिषा आणि शिझान यांच्यात बिनसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. शिझानने आपली फसवणूक केल्याची माहिती तुनिषाने कुटुंबियांना दिली होती. तुनिषाच्या निधनाने तिच्या आईची प्रकृती आता खालावली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली होती. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला अटक केली.

तुनिशा आणि शिझान हे सब टीव्हीच्या अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशाने आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिचे आधीच निधन झाले होते.

Shizan Khan in police custody on charges of inciting actress Tunisha Sharma to commit suicide

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात