विशेष प्रतिनिधी
मुंबई:संजय राऊत यांनी कालच राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं होतं. अजित पवारांना सांगू आमचं ऐका,नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर आज आपली नाराजी थेट व्यक्त न करता अजित पवार यांंनी ‘मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही’ असं खोचक विधान करत आपण राऊत यांंच्या धमकीला घाबरलो असचं काहीसं दाखवून दिलं.ShivSena Vs NCP: … and Ajit Pawar scared of Sanjay Raut’s threat to return home …
निवेदिकेने एवढ्यावेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावलं. मुख्यमंत्री उठायचे, त्यामुळे आम्हालाही उठावं लागत होतं. एकदाच सांगितलं असतं तर सगळं संपलं असतं. पण तुमच्या हातात माईक असल्याने आम्हाला काही बोलता येत नाही. अन मुख्यमंत्र्यांच्या पुढे आमचं काही चालत नाही’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमात अजित पवार यांनी मिश्किल शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना हे उद्दीष्ट समोर ठेवून आजचा पर्यटन दिवस साजरा करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सनी राज्यातील पर्यटनाचे छान फोटो काढले. ते फोटो पाहून महाराष्ट्रात खूप काही हे समजते. एवढी सुंदर फोटोग्राफी आहे की बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतात. जे चांगलं आहे त्याचं कौतुक महाराष्ट्र कायमच करत असतो.
मुख्यमंत्रीही फोटोतले दर्दी आहेत त्यांचीही अनेक पुस्तकं आहेत. असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App