नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारूण अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साधी दखलही घेतलेली नाही.Shivsena UBT may break alliance with Congress
महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दारूण अपयश आले. त्याची कारण शोधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये विशेष निरीक्षक नेमून शिव सर्वेक्षण करून घेतले. या शिव सर्वेक्षणामध्ये शिवसेनेच्या संघटनेचा जो कणा आहे, त्या प्रत्येक शाखांवर जाऊन शाखाप्रमुख आणि तिथल्या प्रमुख शिवसैनिकांशी बोलून आपल्या पक्षाचे विधानसभा निवडणुकीत नेमके काय चुकले??, संघटनात्मक पातळीवर आपण कुठे कमी पडलो??, राजकीय भूमिका घेताना आपल्याला कुठे अपयश आले??, याची तपशीलवार माहिती घेतली गेली. त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचविण्यात आला.
या शिव सर्वेक्षणाचा निष्कर्ष असा निघाला की, काँग्रेसची साथ संगत केल्यामुळे आपले हिंदुत्व पातळ झाले. त्यामुळे आपण मतदारांना पुरेशा शक्तीनिशी अपील करू शकलो नाही. लाडकी बहिणी योजनेचा परिणाम मतदारांवर टिकून राहिला. आपण जरी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले होते, तरी यांनी ती योजना सुरू केली, त्यांनाच मते का देऊ नयेत??, अशी विचारणा मतदारांनी केली. त्या प्रश्नावर आपल्याकडे उत्तर नव्हते. सबब आपण काँग्रेसची संगत सोडून देऊन प्रखर हिंदुत्वाचा आधार घेत स्वबळावर निवडणूक लढवावी, असा फीडबॅक शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी दिल्याचे शिव सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहे. स्वतः उद्धव ठाकरे हा अहवाल बारकाईने तपासून त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असून आज शिव सर्वेक्षणाच्या विशेष निरीक्षकांची त्यांच्या समवेत बैठक होणार आहे.
– पवारांच्या राष्ट्रवादीची दखलही नाही
पण या सगळ्या शिव सर्वेक्षणात अथवा उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयात सध्या तिच्या आघाडीत काम करतात, त्या महाविकास आघाडीतला तिसरा घटक पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याची साधी दखलही घेतली गेली नसल्याचे दिसून आले. कारण मुंबईत शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीची मूळात ताकदच नव्हती, त्यात राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार आजचे राष्ट्रवादी घेऊन गेल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईतले अस्तित्व शिल्लक उरले नव्हते. अशा स्थितीत त्यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले काय किंवा न जुळवून घेतले काय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काहीच फरक पडत नाही, असे लक्षात आल्याने शिव सर्वेक्षणात पवारांच्या राष्ट्रवादीची दखलही घेतली गेली नाही. अर्थातच उद्धव ठाकरेंच्या निर्णयामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला काही विचारण्याचे कारण उरले नाही.
– पवारांची मूळ समस्या
स्वतः शरद पवार देखील गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांपासून विशिष्ट अंतर राखून आपले राजकीय वाटचाल करताना दिसत आहेत. ज्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत काही उपयोगच झाला नाही, ती टिकवून तरी करायचे काय?? उलट त्या महाविकास आघाडीचे डोक्यावरचे ओझे लवकरात लवकर उतरवून महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र वाटचाल करता येईल का??, याची चाचपणी पवारांची राष्ट्रवादी देखील करत असल्याच्या बातम्या आहेत. परंतु त्यांच्या राष्ट्रवादीतल्या उरलेल्या 10 आमदारांना आणि अजित पवारांच्या सत्तेची वळचण खुणावत आहे. त्यामुळे पवार लगेच कुठला निर्णय घेण्याच्या राजकीय स्थितीत उरलेले नाहीत. किंबहुना आपले उरलेले आमदार टिकून राहणार याची चिंता आता पवारांना सतावत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App