नाशिक : ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!, अशी ठाकरे सेनेची दुहेरी राजकीय भूमिका आज समोर आली.Shivsena UBT double standard
मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांचा महापौर बसणार नाही याची खात्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपची साथसंगत ठोकरून लावली. आमचा जन्म काही सत्तेसाठी झाला नाही. भाजपच्या साथसंगतीने महापौर बसवावा, अशी वेळ आमच्यावर आलेली नाही, असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी भाजप किंवा शिंदे सेना यांच्याबरोबरची हातमिळवणी फेटाळून लावली.
– चंद्रपुरात ठाकरे सेनेचा वेगळा सूर
पण त्याच वेळी चंद्रपुरात मात्र ठाकरे सेनेचे प्रमुख संदीप गिरे यांनी मात्र भाजप आणि ठाकरे सेना सत्तेसाठी एकत्र येऊ शकण्याचे संकेत दिले. ठाकरे सेनेचे सहा आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन असे आठ नगरसेवक मिळून त्यांनी एक गट बनवला आणि त्याची नोंदणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केली आमच्या गटाला जो महापौर पद देईल, त्याच्याबरोबर आम्ही जाऊ शकतो, असे संदीप गिरे यांनी जाहीर केले.
– ठाकरे सेनेलाच हवे महापौर पद
चंद्रपुरात कुठल्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. तिथे काँग्रेसचे 30 आणि भाजपचे 23 नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी चुरस निर्माण झाली असून ठाकरे सेना आणि वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक ज्यांना पाठिंबा देतील, त्यांचा महापौर बसेल, अशी राजकीय स्थिती आहे. पण ठाकरे सेनेनेच स्वतःसाठी महापौर पद मागितल्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची गोची होऊन बसली.
पण या सगळ्यामुळे ठाकरे सेनेची दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या समोर आली. संजय राऊत यांनी एकीकडे छाती पुढे काढून मुंबईत भाजपची साथसंगत नाकारली, पण दुसरीकडे त्यांच्या सेनेच्या शहरप्रमुखाने भाजपा बरोबर साथसंगत करायची तयारी चालवली त्यामुळे सत्तेसाठी ठाकरे सेना कोणाही पुढे झुकू शकते, हेच चित्र महाराष्ट्रासमोर उभे राहिले.
– काँग्रेस ठरला भांडणारा पक्ष
दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या भांडणामुळे काँग्रेसची अवस्था सगळ्यात मोठा पक्ष पण सगळ्यात भांडणारा पक्ष अशी होऊन बसली. त्यामुळे त्यांच्याकडे बाकीचे मित्र पक्ष जायला तयार झाले नाहीत. परिणामी चंद्रपुरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येऊ सुद्धा काँग्रेसला सत्तेने हुलकावणे देण्याची शक्यता निर्माण झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App