नाशिक : पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये घातला अडसर!!, अशी राजकीय परिस्थिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली.Shivsena UBT against two NCP coming together
भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाजूला काढून ठेवल्यानंतर पवार काका – पुतण्यांचे पक्ष एक आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली. कारण दोन्ही पक्षांमधल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांवर तसा दबाव आणला आणि आघाडी करण्याचा आग्रह धरला. याला अपवाद फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ठरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्यास नकार दिला. पण पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे बाकीचे नेते आघाडीसाठी अनुकूलच राहिले.
– पवारांना प्रतिसाद नाही
पण याच दरम्यान शरद पवारांनी महाविकास आघाडी म्हणून सगळीकडे निवडणुका लढविण्यासाठी चाचपणी केली. पण त्यांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसने मुंबईसह इतरत्र स्वबळाचा नारा लावला. ठाकरे बंधू मुंबईसह इतरत्र एकत्र आले, पण त्याचा परिणाम म्हणून शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुद्धा एकाकी पडली. पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याखेरीज पर्याय उरला नाही.
– उबाठा शिवसेनेची पाचर
पण आता पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पाचर मारून ठेवली. आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून निवडणूक लढवायला तयार आहोत, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पवारांची राष्ट्रवादी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर गेली, तर आम्ही पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आघाडी करणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवू, असे मूळचे “पवार संस्कारित” पण सध्या शिवसेनेत असलेले नेते सचिन अहिर यांनी जाहीर केले. त्यामुळे पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यात पाचर मारली गेली. ठाकरेंच्या शिवसेनेने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अडसर घातला. त्यामुळे पवार काका पुतण्यांच्या राष्ट्रवादींची कोंडी झाली.
– बळकट भाजपशी लढाई
एकीकडे बळकट भाजप त्यांच्या जोडीला एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्याशी मुकाबला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मते कापण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मैदानात उतरणार, या कात्रीत पवार काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी सापडल्यात. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद घटली असली आणि ती कितीही कमी झाली असली, तरी मते कापण्या इतपत त्यांची ताकद निश्चित आहे आणि पवार काका – पुतण्याच्या राष्ट्रवादीची मते जर ठाकरेंच्या शिवसेनेने कापली, तर शिवसेनेबरोबरच पवार काका पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादींचा पराभव सुद्धा अटळ आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App