Saamana Editorial : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटामुळे शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सेनेने आपले मुखपत्र सामनातून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. अनेक छोटे देश या कठीण काळात भारताला मदत करत असताना, दुसरीकडे केंद्र सरकार सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवायलाही तयार नाही. हा देश तरलाय तो केवळ नेहरू, इंदिरा, राजीव गांधी व मनमोहन सिंग यांच्या योजना, प्रकल्पामुळेच. ही पुण्याई मोठी आहे, असेही शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे. Shivsena Praises Nehru, Gandhi Family in Saamana Editorial, Criticizes Modi Government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटामुळे शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सेनेने आपले मुखपत्र सामनातून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. अनेक छोटे देश या कठीण काळात भारताला मदत करत असताना, दुसरीकडे केंद्र सरकार सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवायलाही तयार नाही. हा देश तरलाय तो केवळ नेहरू, इंदिरा, राजीव गांधी व मनमोहन सिंग यांच्या योजना, प्रकल्पामुळेच. ही पुण्याई मोठी आहे, असेही शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे.
सामनातील अग्रलेखात म्हटलेय की, जगाला आता हिंदुस्थानची भीती वाटू लागली आहे. हिंदुस्थानात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. हिंदुस्थानात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका हिंदुस्थानला बसत आहे. तरीही देश तग धरून राहिलाय तो 70 वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांना देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम व राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल. जागतिक मंचावर हिंदुस्थानची अवस्था बिकट होणे बरे नाही!
देशातील अभूतपूर्व कोरोना संकटावर भाष्य करताना व नेहरू, गांधी घराण्याच्या कर्तृत्वाबाबत अग्रलेखात पुढे म्हटलेय की, हिंदुस्थानपासून जगाला धोका असल्याची चिंता आता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने हिंदुस्थानात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे हिंदुस्थानला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. बांगलादेशने हिंदुस्थानला 10 हजार रेमडेसिवीर वायल्स देणगीदाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर हिंदुस्थानला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही हिंदुस्थान तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते.
केंद्राच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर टीका करताना सामनामध्ये म्हटलंय की, आज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या हिंदुस्थानवर आली. गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय 20 हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते. गुरुवारच्या दिवशी राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष, शेतकरी नेते अजितसिंह कोरोनाचे बळी ठरले. पत्रकार शेष नारायण सिंह कोरोनामुळे सोडून गेले. या दोघांनाही पंतप्रधान मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशाची अवस्था भयावह बनली आहे. त्या भयाचा धसका आपल्या दिल्लीश्वरांनी किती घेतला ते सांगता येत नाही, पण जगाने मात्र हिंदुस्थानातील या परिस्थितीचा मोठाच धसका घेतला आहे.
वास्तविक, दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या असंख्य भाषणांतून व मुलाखतींतून नेहरू-गांधी घराण्यावर टीका केली. काँग्रेसची घराणेशाही हद्दपार करण्यासाठी वेळोवेळी आवाहन केले. आपल्या व्यंगचित्रांतून त्यांनी नेहरू, इंदिरा गांधींच्या अनेक धोरणांवर यथेच्छ टीका केली होती. आता मात्र शिवसेनेने घेतलेली भूमिका पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे. खासकरून हा देश 70 वर्षांपासून तगला तो नेहरू, इंदिरा, राजीव गांधी व मनमोहन यांच्या योजनांमुळे, असे म्हटल्याने याची जास्त चर्चा सुरू झाली आहे.
सामनातील मूळ अग्रलेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Shivsena Praises Nehru, Gandhi Family in Saamana Editorial, Criticizes Modi Government
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App