शिवसेना की शिव्या सेना??; माजी महापौर दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यांना दिली शिवी; हातात पडली बेडी!!

Shivsena or abusive sena

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे की शिव्या सेना??, असा सवाल तयार झाला आहे. मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यांना भो*** ही शिवी दिली त्यावरून गुन्हा दाखल झाला. आज सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली. Shivsena or abusive sena ??; former mayor datta dalvi abused cm eknath shinde, got arrested by police

पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भो*** हीच शिवी पुन्हा उच्चारली आणि दत्ता दळवींचे समर्थन केले. तुमचे मंत्री एवढया शिव्या देत बाहेर फिरतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता का??, त्यांना अटक करता का??, असा उलटा सवाल राऊत यांनी केला.

एकीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे राजकीय नाट्य विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असताना दुसरीकडे दोन शिवसेना मधले हे शिव्या नाट्य आता सुरू झाले आहे.

संजय राऊत यांच्या हिटलरवाल्या पोस्टमुळे इस्रायल संतप्त, परराष्ट्र मंत्रालय आणि ओम बिर्ला यांना लिहिले पत्र

याचे निमित्त झाले, हिंदूहृदयसम्राट या शब्दाचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्या एका पोस्टरवर एकनाथ शिंदेंच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट हे बिरूद लिहिलेले आढळले. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना संतापली. हिंदुस्थानात हिंदूहृदयसम्राट दोनच. पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर, तर दुसरे बाळासाहेब ठाकरे. तिसरे कोणीही नाही, असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सगळे नेते मुख्यमंत्र्यांवर बरसले.

ठाण्यातल्या मेळाव्यात मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध जोरदार भाषण ठोकले. हा स्वतःला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतो याची लायकी आहे का?? हा भो** ठाण्यात पूर्वी काय करत होता??, हे मला माहिती आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने दत्ता दळवी विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आज त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी देखील भो* हा शब्द वापरून दत्ता दळवींच्या शिव्या देण्याचे समर्थन केले. वर भो* शब्दात चुकीचे काय आहे??, हा शब्द तुमच्या धर्मवीर सिनेमातलाच आहे ना!!, अशी मखलाशी केली. हे तेच संजय राऊत आहेत, ज्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत च्यु** म्हटले होते.

शिवसेनेचे ही शिव्या कल्चर जुनेच आहे. ते बाळासाहेबांनी “विकसित” केले. बाळासाहेब कुठल्याही जाहीर सभेत विरोधकांना शिव्या देऊनच संबोधायचे शरद पवारांना ते बारामतीचा म्हमद्या, मैद्याचं पोतं असे म्हणायचे सुरेश कलमाडींना ते बेडूक म्हणाले होते, तर मुलायम सिंह यादव यांना ते येडझ* म्हणाले होते. हेच शिव्या कल्चर झिरपत शिवसैनिकांमध्ये आले आहे.

Shivsena or abusive sena ??; former mayor datta dalvi abused cm eknath shinde, got arrested by police

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात