प्रतिनिधी
नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची?, या विषयावर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज झाली खरी, पण सरकार पडण्याची संजय राऊत यांची तारीख मात्र आज टळली. शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. Shivsena : next hearing on 14 February in Supreme Court
ते मात्र आता शक्य होणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यात ठेवली आहे. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार निदान फेब्रुवारीचा मध्य गाठणार, असे स्पष्ट झाले आहे. 14 फेब्रुवारी हा शुभ दिवस आहे. त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे येतो त्यामुळे सगळे काही प्रेमाने होईल, असे नवे वक्तव्य आता संजय राऊत यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच; भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांनी अजितदादांना घेरले
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय न्यायमूर्तींनी जाहीर केला. यात 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. आता सध्या तरी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 14 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे. 14 ते 21 फेब्रुवारी यादरम्यान, ‘शिवसेना’ पक्ष कोणाचा हे समजणार आहे.
शिवसेनेतील फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसेच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर सुनावणी होणे अपेक्षित आहे.
निवडणूक आयोगाचा ही निर्णय अपेक्षित
खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाणचिन्ह कोणत्या गटाला या विषयावर निवडणूक आयोग निर्णय देणे अपेक्षित आहे. कारण ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी आपापले दावे सादर करून त्यानुसार पदाधिकारी कार्यकारणी शिवसैनिक यांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे त्या कागदपत्रांवर आधारित निवडणूक आयोग निर्णय अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App