प्रतिनिधी
पिंपरी : आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधले पदाधिकारी फक्त पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात लॉबिंग करत होते. परंतु आता स्वतः खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीरंग बारणे यांना डिवचणे सोडलेले नाही. आता खुद्द पवारांच्या घरातूनच बारणे यांना डिवचायला सुरुवात झाली आहे.Shivsena – NCP Fued: Now Shiv Sena is starting to dig out of Pawar’s house and drive away Shrirang Barne; Rohit Pawar said, I will go to Perth’s campaign
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघामधून पार्थ पवारला उमेदवारी दिली तर त्याच्या प्रचारासाठी मी स्वतः जाईन, असे म्हटले आहे. याचा अर्थ शिवसेनेने कितीही इन्कार केला तरी राष्ट्रवादीने श्रीरंग बारणे यांची “विकेट” काढायची हे ठरवले असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची मागणी केली आहे की त्यांना करायला लावली आहे अशी शंका आजच खासदार श्रीरंग बारणे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती ती शंका खरी होताना दिसत आहे त्याच वेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत आणि तेच खासदार राहतील, असे स्पष्ट केले आहे तरी देखील पवारांच्या घराण्यातून शिवसेना पोखरण्याच्या दृष्टीने रोहित पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थचे कॅन्व्हसिंग सुरू केल्याचे दिसून येत आहे.
बारणेंनी केला होता पार्थचा दणकून पराभव
खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांचा मोठ्या फरकाने दणकून पराभव केला होता. पवार घराण्यातला तो पहिला पराभव होता. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ फोडून राष्ट्रवादीकडे घ्यायचाच असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधल्याचे यातून दिसून येत आहे. त्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून लॉबिंग सुरू केले आणि आता त्यात पवार घरातीलच रोहित पवारांनी उडी घेऊन खुंटा हलवून बळकट करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
शिवसेनेला राष्ट्रवादी पोखरतेय
एकीकडे शिवसेनेचे नेते शिवसंपर्क अभियानाद्वारे जरी भाजपवर जोरदार तोफा डागत असले तरी राष्ट्रवादी मात्र शिवसेनेचे बालेकिल्ले असलेले मतदारसंघ फोडायच्या मागे लागलेली दिसत आहे. त्यातही आता पवार घराणे शिवसेनेलाच पोखरायला पुढे सरसावले असल्याचे यातून दिसून येत आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App