विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार अजित पवारांची राजकीय स्टेपनी जोडल्यानंतर अधिक स्थिर झाल्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची भाकिते “राजकीय शास्त्रज्ञांनी” वर्तवली आहेत. पण हे राजकीय शास्त्रज्ञ सत्तेच्या बाह्य वलयातले आहेत, ज्यांचा थेट निर्णय प्रक्रियेशी लांबचा संबंध आहे!!Shivsena MP Pratap jadhav and MlA rohit pawar claims political earthquake in maharashtra but in each other’s camps
महाराष्ट्रात लवकरच काँग्रेस फुटणार आणि त्या पक्षातला एक गट शिंदे फडणवीस सरकारला येऊन मिळणार, असे राजकीय भाकीत बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी केले आहे, तर महाराष्ट्रात शरद पवार केव्हाही पुन्हा राजकीय भूकंप घडवू शकतात असे दुसरे भाकीत आमदार रोहित पवारांनी केले आहे.
पण खासदार प्रताप जाधव शिंदे गटात आहेत. त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेस – राष्ट्रवादी फुटीची अनेक भाकिते केली असली, तरी त्याचे टाइमिंग दरवेळी बरोबरच आलेले आहे, असे नाही. शिवाय प्रताप जाधव हे शिंदे गटातल्या सत्तेच्या बाह्य वर्तुळातले एक महत्त्वाचे घटक आहेत. कारण शिंदे फडणवीस सरकार मधले सगळे निर्णय एकतर स्वतः शिंदे – फडणवीस आणि त्याही पलीकडे जाऊन मोदी – शाह घेतात. त्यांच्या शिवाय प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत बाकी कोणाला स्थान असत नाही आणि प्रत्यक्ष निर्णय घेणारे कधीच कोणते भाकीत न करता प्रत्यक्ष घडामोडी घडवून आणतात. या दृष्टिकोनातून प्रताप जाधव यांच्या काँग्रेस फुटीच्या भाकिताकडे पाहिले पाहिजे.
जसे खासदार प्रताप जाधव यांचे, तसेच आमदार रोहित पवार यांचे. शरद पवारांची महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणण्याची क्षमता किती मोठी आहे, हे सांगताना रोहित पवारांनी लवकरच महाराष्ट्रात पवार भूकंप घडवणार असल्याचे भाकीत केले आहे. पण रोहित पवार हे देखील राष्ट्रवादीतल्या सत्तेच्या बाह्य वर्तुळातले नेते आहेत. शरद पवार अथवा सुप्रिया सुळे किंवा अजित पवार हे स्वतंत्रपणे निर्णय घेतात. त्या प्रत्येक निर्णयात रोहित पवारांना विचारात घेतले जातेच असे नाही. त्यामुळे रोहित पवारांचे भाकीत प्रताप जाधव यांचा दृष्टिकोनातून बघितले पाहिजे.
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थिर आहे. अजित पवारांची राजकीय स्टेपनी त्यांना जोडली आहे. उद्या अजित पवारांची राजकीय स्टेपनी सरकारपासून बाजूला झाली, तरी सरकारवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाही. तरी देखील रोहित पवारांनी शरद पवार महाराष्ट्रात केव्हाही भूकंप घडवून आणू शकतात, असे भाकीत केले आहे. पण त्या भाकिताकडे सत्तेच्या बाह्य वलयातील नेत्याचे भाकीत या दृष्टिकोनातूनच पाहिले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App