नाशिक : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्र जो राजकीय वाद उसळला आहे त्याचे मराठी माध्यमांमधले पडसाद कितीही वेगळे असले तरी त्यामुळे राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही. आधीच गेल्या अडीच वर्षात शिवसेनेला निधी वाटपात राष्ट्रवादीने घाट्यात टाकले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी बंड करून 39 आमदार आणि 9 मंत्री आपल्याबरोबर नेल्यानंतर शिवसेना इकडे फक्त 4 मंत्री उरले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरलेल्या मंत्रिमंडळात खातेवाटपात फेरबदल करावे लागले आहेत. या फेरबदलात देखील शिवसेनेची जबरदस्त पीछेहाट झाली असून शिवसेनेला घाटा आणि राष्ट्रवादीला जास्तीचा वाटा अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना तिसऱ्या नंबरवर पोचली आहे. Shivsena in third place in Uddhav Thackeray cabinet
एकनाथ शिंदे यांच्याशी या सर्व संघर्षात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत बंडखोरी करणाऱ्या मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. या मंत्र्यांच्या खात्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्याचा थेट फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना झाला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रिमंडळातील वर्चस्व आणखी वाढले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्याच शिवसेनेला याचा फटका बसलाय.
काय झाले बदल?
सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब शंकर गडाख हे तीन कॅबिनेट मंत्री सध्या मुख्यमंत्र्यांसोबत आहेत.
पण तरीदेखील राज्यमंत्र्यांच्या खात्यामध्ये शिवसेनेचे सर्व खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वाटावी लागली आहेत. कारण शिवसेनेकडे तेवढे मंत्रीच उरलेले नाहीत. राज्यमंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करत असताना शिवसेनेकडील खाती राष्ट्रवादीच्या 4 तर काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना ही खाती द्यावी लागली आहेत.
शंभूराज देसाई यांच्याकडील गृह, ग्रामीण विकास खाते राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे सोपवले आहे, तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्यावर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता खात्यांची जबाबदारी असेल. काँग्रेसच्याच सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार मिळाला आहे. राजेंद्र पाटील यड्रांवकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाती विश्वजीत कदम यांना तर वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग खाते प्राजक्त तनपुरे यांना सतेज पाटील यांना अन्न व औषध प्रशासन तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे.
शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेल्या बच्च कडू यांच्या खात्यांचा कारभार हा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (शालेय शिक्षण), काँग्रेसचे सतेज पाटील (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार) राष्ट्रवादीचे संजय बनसोडे (महिला व बाल विकास) आणि राष्ट्रवादीचेच दत्तात्रय भरणे (इतर मागास बहुजन कल्याण) यांना दिला आहे.
म्हणजे महाराष्ट्रात आता केवळ मुख्यमंत्री शिवसेनेचे चार मंत्री कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे आणि बाकी मंत्रिमंडळ असले सर्व वर्चस्व आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आणि तुलनेत कमी महत्त्वाची खाती काँग्रेसकडे अशी राजकीय स्थिती येऊन ठेपली आहे.
आधीच गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात राष्ट्रवादीला पहिल्या नंबरवर काँग्रेसला दुसऱ्या नंबर वर आणि शिवसेनेला तिसऱ्या नंबर वर ठेवले आहे तर आता खाते वाटपात देखील शिवसेना मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App