Shivaji Sawant : शिवाजी सावंतांचा भाजपा प्रवेश निश्चित !

Shivaji Sawant

विशेष प्रतिनिधि 

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि पक्षप्रवेश होत आहेत. अशातच सोलापूरात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. Shivaji Sawant



माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या भावाने शिंदेंच्या शिवसेनेला राम राम ठोकला आहे. शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे लवकरच आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार टणजी सावंत हे महायुटी सरकार मध्ये मंत्री राहिलेहॉटे. इतकंच नाही तर शिवसेनेतील बंडामध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधि न देण्यात आल्याने त्यांनी त्यांची नाराजी अनेक वेळा जाहीर देखील केली आहे. या अधिवेशनातही त्यांचा सक्रिय सहभाग दिसला नव्हता. मात्र आता त्यांच्या भावानेच शिवसेनेला राम राम केला आहे.

शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधु असले तरी त्यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. त्यामुळे आता मुळातच शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ कमी असलेल्या किंवा एकही आमदार नसलेल्या सोलापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. Shivaji Sawant

तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत होते तर, दिलीप कोल्हे हे देखील सोलापूरचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत आणि दिलीप कोल्हे या दोघांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. मात्र, आता येत्या दोन दिवसांत आपल्या समर्थकांसाह हे दोन्ही पदाधिकारी व नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसांत शिवाजी सावंत, माजी महापौर दिलीप कोल्हे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवसेना, महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका, पंचायत आणि झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला चांगली रणनीती आखावी लागणार आहे. Shivaji Sawant

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, दिल्या घरी सुखी रहा’ अशा शब्दात त्यांनी तानाजी सावंत व इतर पदाधिकाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे. तसेच, शिवाजी सावंत आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक निर्णय घेतल्याच स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून देण्यात आलं आहे.

Shivaji Sawant’s admission to BJP is certain!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात