विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या १० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून पाठविण्यात येण्याच्या जागेसाठी शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. जुन्या शिवसैनिकांना वगळून नव्यांचा प्रभाव वाढला असल्याने नव्या उमेदवारांचा उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. Shiv Sena’s internal competition for the Legislative Council; Sachin Ahir, Varun Sardesai, Sunil Shinde or Kishori Pednekar?
यामध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांच्यासाठी आमदारकी सोडणारे सुनील शिंदे आणि आता नव्याने आणखी एक नाव पुढे आले आहे, ते कोरोना काळात मुंबईत शिवसेनेची राजकीय बाजू भक्कम पणे लावून धरणार्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे. किशोरी पेडणेकर यांच्या देखील आशा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी पल्लवित झाल्या आहेत.
शिवसेनेच्या अंतर्गत गोटातून वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत युवासेनेचा राजकीय वट सिद्ध करण्यासाठी वरुण सरदेसाई यांची विधान परिषदेची उमेदवारी उपयुक्त ठरू शकते. त्याच बरोबर नव्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी ते दुप्पट वेगाने पळू शकतात, असा यामागे शिवसेनेतल्या नेत्यांचा होरा आहे.
सचिन अहिर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. तेदेखील आपल्याला उमेदवारी मिळाल्यास आपली सर्व ताकद महापालिका निवडणुकीत झोकून देतील असे मानले जात आहे. सुनील शिंदे यांना आपण आदित्य ठाकरे यांच्यासाठी केलेल्या त्यागाची राजकीय किंमत हवी आहे, तर महापौर किशोरी पेडणेकर यांना विधान परिषदेत आपण अधिक प्रभावीपणे कामगिरी बजावू शकतो असा विश्वास वाटतो आहे.
या चारही नेत्यांच्या आपापल्या जमेच्या बाजू आहेत. पण अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच घेणार असल्यामुळे ते कोणत्या जमेच्या बाजूचा विचार करतात?, यावर शिवसेनेचे विधान परिषदेची उमेदवारी ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App