वृत्तसंस्था
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनामाच्या प्रश्नावर शिवसेना पक्ष आक्रमक आहे. परंतु, मूळात ऋतुजा लटके यांनी महापालिका सेवेचा राजीनामा दिला केव्हा??, याबद्दल महत्त्वाचा खुलासा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी राजीनामा सादर केला आहे. कायदा आणि नियम त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देतात. त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारकडून कोणत्या दबावाचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा इक्बाल सिंह चहल यांनी केला आहे. Shiv Sena UBT aggressive over Rituja Latke’s resignation
ऋतुजा लटके यांचा राजीनामा शिंदे – फडणवीस सरकारने मुद्दामून अडवून ठेवला आहे. कारण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांना शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळू न देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे, असा आरोप पक्षाचे नेते अनिल परब यांनी करून हायकोर्टात जाण्याची तयारी केली आहे. त्याच वेळी ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचीच उमेदवारी देण्याचा घाट घातला असल्याची बातमी देखील आली आहे.
परंतु या संदर्भातील कायदेशीर मुद्दा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केला आहे. ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर 2022 रोजी राजीनामा दिला आहे. कायदा आणि नियमानुसार या संदर्भात निर्णय घेण्याची मुभा 30 दिवसांची आहे. अशा स्थितीत राज्य सरकारचा त्यासंदर्भात कोणताही दबाव असण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App